घरफोटोगॅलरीPandharpur : विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न

Pandharpur : विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न

Subscribe

पंढरपूर : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. यंदा हा सोहळा बुधवार, १४ फेब्रुवारी संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात जोरदार तयारी करण्यात आली. विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवण्यात आले.

- Advertisement -

आजच्या विवाहसोहळ्यासाठी विठुराया आणि रुक्मिणीमातेसाठी पांढरा शुभ्र पोशाख बनवण्यात आला आहे. यावर्षी विठुरायाच्या वस्त्रांवर प्रभू श्रीराम आणि सीता यांचे आकर्षक चित्र दोरे कामात रेखाटण्यात आले आहे. या विवाहानिमित्त विठ्ठल रुक्मिणीची पारंपारिक पद्धतीने षोडशोपचारे पूजा करण्यात आली.

- Advertisement -

देवाच्या या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात. त्यानुसार आज हा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात आकर्षित अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी लाल, पिवळा झेंडू, अष्टर, पांढरी शेवंती, पांढरी डिफरी अँथोरियमसह इतर पाना फुलांचा वापर केला आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी गजमंडपाची आरास मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे.

याशिवाय नामदेव पायरी, संपूर्ण मंदिरात आकर्षक तसेच नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे. धार्मिकदृष्ट्या या विवाह सोहळ्याचे खूप महत्त्व असून या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम सकाळपासून पंढरपूर परिसरात सुरू झाली.

यावेळी विठूरायाला शुभ्र पांढऱ्या वस्त्रात सजविण्यात आले. पांढरी पगडी, अंगात जरीकाठी रेशमी अंगी, कमरेला पांढरा शेला आणि पांढरे धोतर या पोषाखातील नवरदेवाला विविध फुलांच्या माळा घालण्यात आल्या. वधू रुक्मिणी माता देखील पांढऱ्या रंगाच्या पैठणीत सजली आहे डोक्यावर सोन्याचा मुकुट, गळ्यात फुलांच्या दागिन्यात रुक्मिणी मातेची मूर्ती साजिरी दिसत होती. वधू वरांच्या अंगावर केशर पाणी आणि गुलाल शिंपडून लग्नाला सज्ज करण्यात आले आहे.

वसंत पंचमीला होणारा श्री विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा दरवर्षी राजेशाही पद्धतीने पार पडतो. मंदिरात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो. आजच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात येते. तसेच वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करुन मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.

फुलांच्या साहाय्याने महालाचे रुप देण्यात आलेल्या विठ्ठल सभा मंडपात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती आणण्यात आल्या. या सोहळ्यात मोजकीच वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. मात्र, देवाचा हा शाही विवाह सोहोळा अनुभवण्यासाठी बाहेर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -