मुंबईत ‘पतंगोत्सवा’चा फिवर

मकर संस्कांतीचा विविध संस्कृतीप्रमाणे आनंद घेतला

Pantagotsav fever in Mumbai
मुंबईत पतंगोत्सवाचा फिवर

देशाच्या कानाकोपऱ्यात मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. त्यातच महाराष्ट्रातही मकर संक्रांतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईत देखील विविध संस्कृतीच्या बांधवांनी मकर संक्रांत आनंद घेतला. मुंबईच्या विविध भागात तरुण, लहान मुले पतंग उडवतानाची दृश्ये दिसत होती. त्याचप्रमाणे महिला वर्गातही मकर संक्रांतीचा उत्साह दिसून येत होता अनेक महिलांना काळे कपडे, आणि त्यावर शोभणारे दागिने परिधान करत तीळगुळ वाटत मकर संक्रांत साजरी केली.