रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैचारिक मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची या शिबिराला प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) कर्जत येथे वैचारिक मंथन शिबिरास गुरुवारी (30 नोव्हेंबर) झेंडावंदन करून प्रारंभ करण्यात आला.
झेंडावंदनावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सर्व नेते पारंपरिक वेशात दिसून आले.
कर्जमध्ये आयोजित या वैचारिक मंथन शिबिराला राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांची उपस्थिती दिसून आली.
यावेळी प्रफुल्ल पटेल पारंपरिक वेशभुषेत पदाधिकाऱ्यांना अभिवान करताना दिसून आले.