लाडक्या बाप्पाचे आगमन मंगळवारी होणार आहे. पण राज्यभरातील मोठ्या गणेश मंडपात जल्लोषात गणपती बाप्पाचे आमगम देखील झाले आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव पाहाण्यासाठी जगभरातून लोक येतात. यामुळे पुढील 10 दिवस गणेशभक्तांची अलोट गर्दी गणेश मंडळता पहायला मिळते. यावेळी अनेक बाप्पाच्या वेगवेगळ्या गणेश मुर्त्या पाहायला मिळतात. तसेच काही गणेश मंडळात सामाजिक, राजकीय यातून चांगला संदेश देणारे देखावे सुद्धा पाहायला मिळतात.
सध्या इको फ्रेंडली बाप्पाच्या मूर्ती बनविणाऱ्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
गणेशोत्सवातील 10 दिवसात गणपती बाप्पाच्या अनेक इको फ्रेंडली मूर्ती पाहयाल मिळतील.
मुंबईच्या भायखळा येथील कळंबा चाळ गणेश मंडळाच्या मूर्ती ही धान्यांनी बनवलेली आहे.
बाप्पाची मूर्ती ही ज्वारी, बाजरी, नाचणी, कणीस या धान्यापासून बनवलेली आहे.