घरफोटोगॅलरीPhoto : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायी मुंबईत दाखल, पालिकेकडून सुविधा

Photo : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायी मुंबईत दाखल, पालिकेकडून सुविधा

Subscribe

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल झाले आहेत. या अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेतर्फे यंदाही तात्पुरता निवारा, शामियाना, व्हीआयपी कक्ष, नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये, स्‍नानगृहे, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisement -

नियंत्रण कक्षाशेजारी, तोरणा प्रवेशद्वाराजवळ तसेच सूर्यवंशी सभागृह मार्गासह विविध 11 ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व्यतिरिक्‍त डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्‍य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथे देखील तात्पु्रत्या निवा-यांसह पुरेशा संख्येने फि‍रत्या शौचालयांची सुविधा देखील आहे.

त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून समाजमाध्यमांद्वारे देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -