घर फोटोगॅलरी Photo : काँग्रेस नेते राहुल गांधी बाइकने पोहोचले लडाखमध्ये

Photo : काँग्रेस नेते राहुल गांधी बाइकने पोहोचले लडाखमध्ये

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लेह-लडाखच्या दौऱ्यावर गेले आहेत. शनिवारी ते बाइकवरून लडाखमधील पॅंगोंग लेक येथे पोहोचले. आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीसोबतच राहुल गांधी लडाखमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांशी संवादही साधणार आहेत.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर बाइकवरील प्रवासाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राहुल गांधी हे KTM 390 Adventure चालवताना दिसत आहेत. त्यांनी हेल्मेट, हातमोजे, राइडिंग बूट आणि जॅकेट परिधान केले आहे.

- Advertisement -

काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या राइडची काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत आणि ‘मोहब्बत का सफरनामा’ असे कॅप्शन त्याला दिले आहे.

 

इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करताना, पँगॉन्ग लेककडे जाताना… जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी ते एक आहे, असे या लेकबद्दल माझे वडील म्हणायचे. तिथे ते, त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती (20 ऑगस्ट रोजी) साजरी करणार असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisment -