घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३Photo : काँग्रेसच्या 'कर्नाटक विजया'चा जल्लोष मुंबईतही...

Photo : काँग्रेसच्या ‘कर्नाटक विजया’चा जल्लोष मुंबईतही…

Subscribe

कर्नाटकमध्ये सत्तांतर होणार, हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेसने 68 जागांवर विजयी मिळवला असून 68 मतदारसंघात आघाडीवर आहे. तर, भाजपा 30 जागांवर विजयी झाला असून 34 जागांवर आघाडीवर आहे. तर, जनता दल (सेक्युलर) 12 जागा जिंकल्या तर, 8 जागांवर आघाडी घेतली आहे. अशा रीतीने आता कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष कर्नाटकात तर सुरू आहेच, पण त्याचबरोबर मुंबईतही टिळक भवन या काँग्रेस मुख्यालयात विजयाचा आनंद साजरा करण्यात येत आहे.

- Advertisement -

टिळक भवन मुख्यालयाजवळ फटाके फोडून ढोलताशाच्या गजरात कार्यकर्ते नाचत आहेत.

कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिले की, या देशातील जनतेला द्वेषाचे राजकारण आवडत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे.

कर्नाटकात बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसला जवळपास 136 जागा मिळतील, असे सध्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -