दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीची रेलचेल ही प्रत्येक कुटुंबाची आनंदाची गोष्ट असते. लोक ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा लक असल्याचे बोलले जाते. पण दादरमध्ये दिवाळीच्या खरेदी पाहिल्यानंतर कळेल की, लोक हे फिझिकल खरेदीवर जास्त भर दिसून येत आहे.
आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी निमित्ताने सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. सराफांच्या दुकानात सोने-चांदी खरेदी करण्याची गर्दी पाहायला मिळाली.
दादरच्या बाजारपेठेत रंगीबेरंगी पणत्या, रांगोळ्या, रोषणाई, घर सजवण्यासाठी प्लॅस्टिकची आकर्षक फुलांची तोरण, हार, कंदील खमंग फराळ, कपडे, आदी गोष्टी खरेदीसाठी ग्राहकांनी फुलून गेल्याचे चित्र दिसून आले.
दादरच्या बाजारपेठा लक्ष्मीपूजनासाठी श्री लक्ष्मीची मूर्ती, केरसुणी, लाह्या, बत्तासे, श्री लक्ष्मीचे फोटो आदी छोट-मोठ्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठा मोठी गर्दी दिसत आहे.
दादरमध्ये खरेदीसाठी मुंबई उपनगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, विरार, वसई, नालासोपारा, नवी मुंबई, खारघर, बेलापूर आदी ठिकाणाहून लोक येतात.