मुंबई : गणरायाच्या आगमनाला अगदी 3 दिवस उरले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी लगमग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या घरी येणाऱ्या लाडक्या बाप्पासाठी वेगळी आरास असेल किंवा इतर गोष्टींची तयारी करण्यासाठी आज शनिवारी असल्याने मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
दादर रेल्वे स्टेशन बाजूलाच मार्केट असल्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या लोकांनी आज गणपतीनिमित्त खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
बाप्पासाठी लागणारं आभूषण असतील, मिठाई असेल किंवा गणेशोत्सवानिमित्त स्वत:साठी नवीन कपडे खरेदी करण्यासाठी भाविकांनी दादर मार्केटमध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या रविवार असल्याने खरेदीसाठी आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दडी मारून बसलेल्या पावसाने दहीहंडीच्या मुहूर्तावर पुन्हा आगमन केले. तेव्हापासून पाऊस अधूनमधून बरसताना दिसत आहे. आजही पावसाने हजेरी लावली होती. मात्र गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस उरले असल्यामुळे भर पावसातही भाविक खरेदी करताना दिसत आहेत.
गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस बाकी असल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळातील गणपतीचे आगमनही वाजत गाजत होताना दिसत आहे.
नागपूर : नागपूरमध्ये गुरुवारपासून (21 सप्टेंबर) पावसाची सततधार सुरू असून आज (23 सप्टेंबर) अवघ्या 4 तासांत 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अंबाझरी...
मुंबई : घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला पहिल्याच दिवसापासून त्याच्या आवडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवून बाप्पाचे पूजन करण्यात...
भंडारा : केंद्रातील भाजपा सरकारचे 'अपयश' अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत 'जनसंवाद यात्रेचं' आयोजन करण्यात आलं आहे. गाव,...