HomeफोटोगॅलरीPHOTO : विधिमंडळात धीरज देशमुख यांच्या हटके लुकची चर्चा

PHOTO : विधिमंडळात धीरज देशमुख यांच्या हटके लुकची चर्चा

Subscribe

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलविले होते. या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा समाजाला आरक्षणचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर देखील झाला आहे. आज मराठा आरक्षणासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनासाठी सत्तधारी आणि विरोधक नेते विधिमंडळात एकवटले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि काँग्रेसचे खासदार धीरज देशमुख यांच्या पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधले होते.

धीरज देशमुख यांनी ‘एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण’ असे असे लिहिलेले नेहरू जॅकेट आणि डोक्यावर गांधी टोपी परिधान करून धीरज देशमुख यांनी विधिमंडळात प्रवेश केला.

धीरज देशमुखांच्या गांधी टोपीवर मराठा आरक्षण लिहले होते. त्यावेळी सर्वांची नजर ही धीरज देशमुख यांच्यावर हटके आणि ड्रेण्डी लूकमध्ये सर्वांची त्यांच्या नजर खेळती राहिलीत. पण धीरज देशमुख हे चर्चेचा विषय देखील झाले होते.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाची अधिसूचना दिली होती. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. मनोज जरांगे हे घरी जाताना पुन्हा त्यांना आंदोलन सुरू करावे लागले. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे”, अशीही मागणीधीरज देशमुख यांनी केली.