नवी दिल्ली : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज, शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. (PHOTO: Dignitaries take the last darshan of former Prime Minister Manmohan Singh)
डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या 3, मोतीलाल नेहरू मार्ग येथील निवासस्थानातून अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात नेण्यात आले.
काँग्रेस मुख्यालयात सुमारे तासभर त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे अंतिम दर्शन घेतले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि त्यांच्या एका मुलीनेही त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
फुलांनी सजवलेल्या वाहनातून डॉ. मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी “मनमोहन सिंग अमर रहे” अशा घोषणा देण्यात येत होती.
या अंत्ययात्रेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी सहभागी झाले होते.
भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मानले जाणारे डॉ. मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 असे 10 वर्षे पंतप्रधान होते. (PHOTO: Dignitaries take the last darshan of former Prime Minister Manmohan Singh)