जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मंगळवारी (7 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मंगळवारी (7 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मंगळवारी (7 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
जवानांसोबत फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही रात्रंदिवस सीमेवर प्राणपणाने बाजी लावून देशाचे रक्षण करतात, त्यामुळे आम्ही सर्व सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुपवाडा येथे मराठा बटालियनच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवानांसोबत फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.