भंडारा : केंद्रातील भाजपा सरकारचे ‘अपयश’ अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत ‘जनसंवाद यात्रेचं’ आयोजन करण्यात आलं आहे. गाव, खेडे, तालुका, शहर या सर्व भागातून जनसंवाद यात्रा जात असून दररोज 25 किलोमीटर असा प्रवास करत आहे. आज काँग्रेसची जनसंवाद यात्रा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी या गावात पोहचली. यावेळी स्थानिक नागरिकांकडून या यात्रेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. (PHOTO Enthusiastic response to Congress’s Janasamwad Yatra in Bhandara)
जनसंवाद यात्रा आज भंडाऱ्यातील मोहाडी या गावात पोहचली. यावेळी गावातील स्थानिक स्त्रीयांकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी त्यांच्या आजूबाजूला नागरिका जमा झाल्याचे पाहायला मिळाले.
जनसंवाद यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांसह स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला आहे. काँग्रेसची जनसंवाद यात्रा पाहणाऱ्या नागरिकांचे अभिवादन नाना पटोले हात दाखवून स्विकारताना दिसत आहेत.
जनसंवाद यात्रेला प्रत्येक गावातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असून स्त्रियानीही या यात्रेत सहभाग घेतला आहे. वयोवृद्ध स्त्रिया नाना पटोले यांच्यासोबत जनसंवाद यात्रेत चालताना दिसत आहेत.
काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून गावातील नागरिकांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन साथ देताना दिसत आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्धा जिल्ह्यातील आष्टीतून जनसंवाद यात्रेला सुरुवात केली होती. माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. या पदयात्रेला जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला.
वर्धा तालुक्याच्या तरोडा येथून सुरु झालेली पदयात्रा मदनी, करंजीकाजी, करंजीभोगे होत सेवाग्राम येथे पोहचली. या पदयात्रेत आमदार रणजित कांबळे, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दररोज पंचवीस किलोमीटर चालत या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांनी थेट जनतेशी संवाद साधला.
नागपूर : नागपूरमध्ये गुरुवारपासून (21 सप्टेंबर) पावसाची सततधार सुरू असून आज (23 सप्टेंबर) अवघ्या 4 तासांत 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अंबाझरी...
मुंबई : घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला पहिल्याच दिवसापासून त्याच्या आवडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवून बाप्पाचे पूजन करण्यात...
मुंबई : गणरायाच्या आगमनाला अगदी 3 दिवस उरले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी लगमग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या घरी येणाऱ्या लाडक्या बाप्पासाठी वेगळी आरास...