मुंबई : मुंबई आणि पुण्याच्या गणेशोत्सवाची वेगळीच धूम असते. हा उत्सव या शहरांचे विशेष आकर्षण ठरते. गणेशोत्सवाला आता महिना देखील उरलेला नाही. येत्या 19 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती, बुद्धीची देवता असलेल्या लाडक्या बापाचे स्वागत करायला सर्वच सज्ज झाले आहेत. काही मंडळांमध्ये गणरायाच्या मूर्तीचे वाजत-गाजत आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.
परळच्या महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोरया गणपतीची मिरवणूक आज, रविवारी मंडपापर्यंत निघाली होती.
परळच्या महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 78वे वर्ष आहे. समाजप्रबोधनासाठी या मंडळाला अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
त्याचवेळी काळाचौकीच्या महागणपतीची मिरवणूकही निघाली होती.
गणरायाची ही उंच मूर्ती पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी झाली होती.
परळ येथे महागणपती आणि मोर्या गणपतीची मिरवणूक एकत्र आली होती.
परळमधील मोरयाच्या मिरवणुकीत दहिहंडीच्या थरांचे थरारही सादर करण्यात आले.