Photo : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्वानांकडून रेल्वे स्थानकाची पाहणी
मुंबई : अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्यदिनाची राज्य शासनाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वाधित वर्दळीचे रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोलिसांनी श्वानाच्यामार्फत रेल्वे स्थानकाची पाहाणी केली.
(छायाचित्रकार : दीपक साळवी)
- Advertisement -
15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.
कोणतीही घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून मॉक ड्रिल देखील करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी श्वानांकडून रेल्वे स्थानकांची तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे.
मुंबई पोलिसांनी नेहमी वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकाची श्वानामार्फत तपासणी केली.
पोलीस दलात श्वानांमार्फत अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात येतो. यासाठी श्वानांना विशेष असे प्रसिक्षण देण्यात येत असते.
या श्वानाने रेल्वे स्थानकावरील प्रत्येक गोष्टीची तपासणी केली आहे. त्याने प्रवाशांच्या बॅगसुद्धा वास घेऊन तपासल्या आहेत.