मुंबई : चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणरायाच्या आगमनाला आता बरोबर एक आठवडा राहिला आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र खरेदीची लगबग सुरू आहे. आरासाचे सामग्रीने दुकाने सजली असून खरेदीसाठी देखील बाजार गर्दीने फुलत आहेत.
गणरायासाठी नानाविध प्रकारचे आणि आकाराचे मोत्यांचे हार, कंठी पाहायला मिळत आहेत.
बाजारामध्ये खऱ्यांशी स्पर्धा करणारे कृत्रिम फुलांचे हार देखील सर्वांना भुरळ घालत आहेत.
मुंबईसह राज्यभरात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात सर्वत्र दिवाळीसारखाच उत्साह दिसतो. ‘श्रीं’च्या आगमनात दिव्यांची रोषणाई केली जाते.
गणरायाचा नैवेद्य म्हणजे मोदक. त्यामुळे विविध मिष्टान्नांच्या दुकानांमध्ये काजूमोदकाची पाकिटे पाहायला मिळत आहेत.
गणराज रंगी नाचतो… गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत घराघरांमध्ये सकाळ-संध्याकाळी आरत्यांद्वारे गणरायांची आळवणी केली जाते.
गणेशोत्सवाचा मंडप असो की घरगुती गणपती असून आरतीच्या सूरांबरोबरच ढोलकी-मृदुंग आणि टाळ यांची संगत कर्णमधुरता वाढवते.