महाराष्ट्राचे आराध्यक्ष दैवस असलेल्या बाप्पाच्या तयारीसाठी भाविक सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे आगळेवेगळे महत्त्व आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. मुंबईतील मोठ मोठ्या मंडपात बाप्पाचे जल्लोषात आगमन देखील झाले आहेत. तर काही मंडप बाप्पाच्या आगमनाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. तसेच घरगुती बाप्पांच्या स्वागतासाठी भाविक तयारीला लागेल आहेत. यात बाजारपेठा देखील मख, अगरबत्ती, आरास, दिव्याची रोषणाई आदी साहित्यानी सजल्या आहेत.
महाराष्ट्रातील बाप्पाच्या मूर्त्यांची देशभरात मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील बाप्पाच्या मूर्त्यांची देशभरात मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील बाप्पाच्या मूर्ती गुजरात, कर्नाटक, दिल्ली मध्य प्रदेशसह इतर राज्यात रेल्वे ट्रेनने इच्छित स्थळी पोहचविल्या जातात.
आज बाप्पाच्या मूर्त्या गुजरातमधील अहमदाबादसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
यात दोन फुटापासून ते सहा फुटापर्यंतच्या मूर्त्यांना इतर राज्यात मोठी मागणी आहे. आज मुंबईतून अहमदाबाद येथे काही मूर्त्या सीएसएमटी स्टेशन येथून अहमदाबादला जाणाऱ्या ट्रेनमधून पाठवण्यात आल्या आहेत.
बाप्पाची लोभसवाणी मूर्ती, रुबाबदार बाप्पा, मोदकाला मिठी मारले बाप्पा मूर्ती अशा अनेक रुपातील बाप्पा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यात ट्रेनमधून प्रवास करत चालले आहेत.