घर फोटोगॅलरी Photo : अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली नवाब मलिकांची भेट

Photo : अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली नवाब मलिकांची भेट

Subscribe

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची अजित पवार गटाच्या नेत्यांनी कुर्ला येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली ही सदिच्छा भेट घेतली.

- Advertisement -

या भेटीच्या वेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आणि मुंबई विभागीय समन्वय समिती सदस्य संतोष धुवाळी उपस्थित होते.

- Advertisement -

या भेटीदरम्यान नवाब मलिक यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तथापि, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिक यांची मंगळवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना किडनीच्या उपचारासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर ते सोमवारी उपचार सुरू असलेल्या क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर आले.

कुर्ल्यातील जमीन आणि गोडाऊन बाजारभावापेक्षा कमी दरात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याकडून खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. याप्रकरणात फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगात होते.

- Advertisment -