घरताज्या घडामोडीPhoto: पहिल्या दिवशी १७ हजार प्रवाशांना लोकलचा पास

Photo: पहिल्या दिवशी १७ हजार प्रवाशांना लोकलचा पास

Subscribe

दुपारी ३ वाजेपर्यंतच्या पहिल्या सत्रात या सर्व ५३ स्थानकांवर मिळून एकूण १८ हजार ३२४ रेल्वे प्रवाशांची पडताळणी पूर्ण करण्यात आली.

मुंबईतील सर्वसामान्‍य नागरिकांना येत्‍या स्‍वातंत्र्य दिनी म्‍हणजेच दिनांक १५ ऑगस्‍ट २०२१ पासून उपनगरीय रेल्‍वे प्रवास करण्‍यास मुभा देण्यात आली आहे.  सर्वसामान्‍य नागरि‍कांना कोविड लशीचे दोन डोस घेतल्‍यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्‍यांचे लसीकरण अंतिम प्रमाणपत्र व छायाचित्र असणारे ओळखपत्र पडताळण्यात येत आहे. सकाळी ७ वाजेपासून मुंबईतील ५३ रेल्वे स्थानकांवर ही प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर मिळून ३५८ मदत कक्ष कार्यान्वित झाले आहेत. आज दुपारी ३ वाजेपर्यंतच्या पहिल्या सत्रात या सर्व ५३ स्थानकांवर मिळून एकूण १८ हजार ३२४ रेल्वे प्रवाशांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. ( छायाचित्र – दीपक साळवी)

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -