प्रमुख पाहुणे म्हणून L&T फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO दीनानाथ दुभाषी उपस्थित यांनी घंटा वाजवून 'मुहूर्त ट्रेडिंग' सुरूवात केली.
मुंबई : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र पार पडले. ‘मुहूर्त ट्रेडिंग’ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून L&T फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO दीनानाथ दुभाषी उपस्थित होते. 15 मिनिटांच्या प्री-मार्केट सत्रासह, संध्याकाळी 6 ते 7.15 यावेळत शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग पार पडले. त्यानंतर बाजाराने जोरदार सुरुवात केली. (Photo Muhurta Trading takes place in Bombay Stock Exchange Initially the Sensex rose by 366.86 points)
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ने गेल्या महिन्यात सण साजरा करण्यासाठी ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार लक्ष्मी पूजन करून ‘मुहूर्त ट्रेडिंग’ला सुरुवात झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून L&T फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO दीनानाथ दुभाषी उपस्थित यांनी घंटा वाजवून ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सुरूवात केली.
दिवाळीला ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सुरू होताच सेन्सेक्स 366.86 अंकांनी वधारला, सध्या सेन्सेक्स 65,271.54 वर आहे.
मुंबई शेअर बाजारात उपस्थित ट्रेडर्सनी आपल्या कुटुंबासह मुहूर्ताचे ट्रेडिंग करून आर्थिक तेजीचा संकल्प सोडला.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ‘मुहूर्त ट्रेडिंग’निमित्ताने फुलांची मोठी रांगोळी काढण्यात आली होती.
दिवाळी सण असल्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लाईटिंगने उजळले होते.