दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुणे येथून सुरू झालेल्या रोहित पवार यांची संघर्ष यात्रा उपराजधानी नागपूरच्या वेशीवर जाऊन ठेपली आहे. अमरावती जिल्ह्याची सीमा ओलांडून बुधवारी (6 डिसेंबर) रोजी नागपूरकडे मार्गक्रम करीत आहे. आता ही संघर्ष यात्रा उद्या गुरुवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळावर धडकणार आहे.
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) येथून पुलगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने ‘युवा संघर्ष यात्रा’ जात असताना रस्त्यात अमित देशमुख (सालोड, जि. वर्धा) या नवरदेवाची भेट झाली. त्यांनी स्वतः युवा संघर्ष यात्रेत सहभागी होऊन युवांच्या प्रश्नांना पाठींबा दिला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी त्यांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
युवा संघर्ष यात्रेदरम्यान देवगावमध्ये (ता. धामणगांव रेल्वे, जि. अमरावती) महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आमदार रोहित पवार यांनी अभिवादन केलं. यावेळी रोहित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर, विकास लवांडे, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अमरावती येथून नागपूरकडे जाताना मार्गाने जात अशताना रोहित पवार हे संत्री वाटताना दिसले.
संपूर्ण युवा संघर्ष यात्रेमध्ये आपापल्या हद्दीत स्थानिक पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला जातो. या सहकार्याबद्दल पोलीस दलाचेही आमदार रोहित पवार यांनी आभार मानले.
‘युवा संघर्ष यात्रे’त दिलीप विश्वास बोबडे यांची भेट झाली असता त्यांनी मूकबधिर असलेल्या त्यांच्या मुलाची माहिती दिली. त्याने ITI चं कौशल्य शिक्षण घेतलं असूनही त्यास नोकरी नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.