Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeफोटोगॅलरीPHOTO : नितीश कुमार यांनी पाच वर्षांत तिसऱ्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

PHOTO : नितीश कुमार यांनी पाच वर्षांत तिसऱ्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Subscribe

नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदी म्हणून विराजमान झाले आहेत. या शपथ विधी सोहळ्यात भारत मता की जय, जय श्री राम यांच्या घोषणा देण्यात आल्या.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शपथ विधी सोहळ्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.

नितीश कुमार यांनी आज सकाळी राज्यपाल राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यानंतर इंडिया आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीतून बाहेर पडल्याचे नितीश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मी माझ्या पक्षातील नेत्यांची चर्चा केली. त्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आम्ही भाजपासोबत युती केली होती. ती युती तोडून काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल यांचे महाआघाडी तयार केले होती. पण अवघ्या दीड वर्षात महाआघाडीला नितीश कुमार यांनी सोडचिठ्ठी दिली.

 

नितीश कुमार यांनी पाच वर्षात तिसऱ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गेल्या 10 वर्षांत नितीश कुमार यांनी पाच वेळा वेगवेगळ्या आघाडी आणि युतीसह सत्ता स्थापन केली होती.