देशात नवीन संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. यावेळी दोन महिला कुस्तीपटू याचवेळी भारताचा तिरंगा हातात घेऊन पोलिसांपासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
- Advertisement -
दिल्ली पोलीस जेव्हा आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घ्यायला आले तेव्हा कुस्तीपटूं बजरंग पुनिया आणि त्यांना समर्थन करणारे आंदोलन भारताचा झेंडा धरून एकत्र बसलेले दिसत आहेत.
दिल्ली पोलिसांनी साक्षी मलिकसह सर्व आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेतले असून जंतरमंतर येथील आंदोलनस्थळी असलेले त्यांचे तंबूही हटवण्यात आले आहेत. यावेळी साक्षी मलिक पोलिसांच्या ताबडीतून स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
- Advertisement -
दिल्ली पोलीस पुरुष कुस्तीपटूंला खेचत घेऊन जाताना दिसत आहेत.
महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला दिल्ली पोलीस आणि सीआरएफची महिला तुकडी जबरदस्तीने ताब्यात घेत असताना.
महिला कुस्तीपटूंला दिल्ली महिला पोलीस ताब्यात घेताना.
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलीस बसमधून पोलीस स्टेशनला घेऊन जाताना.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्यावर लागलेले...