घरफोटोगॅलरीPHOTO : गणरायाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गिरगाव चौपाटीवर सज्जता

PHOTO : गणरायाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गिरगाव चौपाटीवर सज्जता

Subscribe

मुंबई : मुंबईसह राज्यात गेले 10 दिवस गणेशोत्सवाची धूम आहे. पण उद्या, गुरुवारी पुढच्या वर्षी लवकर या…, असा आग्रह करत सर्वांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाईल. गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा अशा विविध चौपाट्यांसह तलाव, कृत्रिम तलाव सज्ज करण्यात आले आहे. मुंबईची ओळख असलेल्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन प्रामुख्याने गिरगाव चौपाटीवर केले जाते.

- Advertisement -

गणेश विसर्जनासाठी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी महापालिकेबरोबरच मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

- Advertisement -

सुरक्षेच्या दृष्टीने 60 निरीक्षण मनोरे, विविध ठिकाणी 68 स्वागत कक्ष, आरोग्य विभागाकडून 75 प्रथमोपचार केंद्रांसह 61 रुग्णवाहिका आदी यंत्रणांची तयारी महापालिकेकडून करण्यात आली आहे.

चौपाटीवर होणाऱ्या गर्दीत चेंगराचेंगरी किंवा अन्य एखादा अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांना घ्यावी लागते. त्यामुळे पोलिसांवर सर्वांधिक ताण असतो.

‘बेस्ट’ च्या सहकार्याने 1 हजार 83 फ्लडलाइट आणि 27 सर्चलाइट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी 121 फिरती प्रसाधनगृहे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

(सर्व छायाचित्रे – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -