Photo: मुंबईत पावसाला सुरुवात, वातावरणातील बदलाने मुंबईकर सुखावले

मुंबईत ९ ते १२ जून दरम्यान मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Photo: Rains begin in Mumbai, climate change soothes Mumbaikars
Photo: मुंबईत पावसाला सुरुवात ,वातावरणातील बदलाने मुंबईकर सुखावले

आज सकाळपासून मुंबईच्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वातावरणात बदल झाल्याने मुंबईकर चांगलेच सुखावले आहेत. (Photo: Rains begin in Mumbai, climate change soothes Mumbaikars) सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. दुपारी मुंबईत पावसाने थोडीशी विश्रांती घेतली मात्र संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली.  मुंबईत ९ ते १२ जून दरम्यान मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहा मुंबईच्या सीएसएमटी परिसरातील पावसाची मनमोहक दृष्य. ( छायाचित्र – दीपक साळवी )