मुंबई : दिवाळी आता अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. असे मोठे सण म्हणजे खरेदीची संधी. दिवाळी म्हणून घरोघरी साफसफाईला जसा वेग येतो तसाच दिवाळीच्या आधीचा रविवार हेरून खरेदी केली जाते. त्यामुळेच दिवाळीपूर्वीच्या सुटीच्या दिवशी बाजारात ग्राहकांची चिक्कार गर्दी दिसते. (छाया : दीपक साळवी)
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. यानिमित्त बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे, आकारांचे कंदील आले आहेत. अशा वेगळ्या प्रकारच्या कंदिलांना नेहमीच मागणी असते.
दिवाळी म्हटली की फटाके आलेच. त्या आवाजाचा कितीही त्रास होत असला, तरी दिवाळीत फटाके वाजवणं कोणीही सोडत नाही. त्यामुळे आता फटाक्यांच्या दुकानातही गर्दी दिसते आहे.
दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारची दिव्यांची तोरणे बाजारात आलेली दिसतात. अशा रंगीबेरंगी आणि सुंदर दिसणाऱ्या तोरणांना चांगलीच मागणी आहे.
अलीकडे पणत्यांऐवजी इलेक्ट्रिकच्या समया किंवा पणत्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसतात. याकडेही ग्राहकांचा वाढता कल आहे.
दिवाळीला सजावटीसाठी कृत्रिम फुलांची तोरणे बांधण्याचा एक नवीन ट्रेंड सेट होऊ पाहतो आहे. त्याचेही निरनिराळे प्रकार बाजारात दिसतात.
दिवाळीनिमित्त माहीमची प्रसिद्ध कंदील गल्ली देखील सजली आहे. निरनिराळा प्रकारच्या कंदिलांमुळे अत्यंत मनमोहक दिसणाऱ्या या गल्लीत देखील आता गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे.