Photo: SSC निकालाची वेबसाइट हँग, विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत

तांत्रिक बिघाड असून वेबसाइट सुरुळीत करण्याचे काम सुरु असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे

SSC results website hangs, parents with students, teachers awaiting results
Photo: SSC निकालाची वेबसाइट हँग, विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत

दहावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या दोन अधिकृत वेबसाइट सुरु होत नसल्याने विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक दहावी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. ( SSC results website hangs, parents with students, teachers awaiting results)  दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र २ तास होऊन गेले असतानाही निकालाची वेबसाइट सुरू झालेली नाही. दहावी निकालाची वेबसाइट क्रॅश झाल्याची माहिती दहावी बोर्डाकडून देण्यात आली असून हा तांत्रिक बिघाड असून वेबसाइट सुरुळीत करण्याचे काम सुरु असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. (छायाचित्र – प्रज्ञा घोगळे)