घरफोटोगॅलरीPHOTO : पहिली 'आस्था ट्रेन' मुंबईहून अयोध्येला रवाना

PHOTO : पहिली ‘आस्था ट्रेन’ मुंबईहून अयोध्येला रवाना

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी ‘आस्था ट्रेन’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. प्रभू श्रीरामाच्या जयघोषाच्या भक्तिमय वातावरणात पहिली ‘आस्था ट्रेन’ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी रात्री अयोध्येला रवाना झाली. या ‘आस्था ट्रेन’ला हजारो रामभक्तांच्या उत्साहात आणि जल्लोषात शुभारंभ झाला झाले.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांनी प्रभू श्री रामाची आरती केली

- Advertisement -

या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर आदी भाजपाचे नेते उपस्थित होते.

मुंबई ते अयोध्या या पहिल्या ‘अयोध्या आस्था’ ट्रेनला हजारो रामभक्तांच्या उत्साहात आणि जल्लोषात शुभारंभ केला.


‘रामलला हम आयेंगे मंदिर भव्य बनायेंगे’ ही घोषणा व स्वप्न सत्यात उतरविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -