Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : मुंबईतील 'या' गणपती मंडळातील बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची होते गर्दी

Photo : मुंबईतील ‘या’ गणपती मंडळातील बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची होते गर्दी

Subscribe

राज्यभरात गणेशोत्सव मोठा धूमधाममध्ये पाहायला मिळतो. गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पुढील 10 दिवस हा गणेशोत्सव राज्यभरात सुरू असतो. मुंबईतील गणेशोत्सवाची एक आगळी वेगळी मज्जा आहे. मुंबईतील मोठ मोठ्या गणपती मंडळातील बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. गणेश भक्त हे पुढील 10 दिवस मुंबईमधील अनेक मंडळातील गर्दी ही पाहण्यासारखी असते. मुंबईत अनेक प्रसिद्ध गणपती मंडळ आहेत. यात किंग सर्कल येथील जीएसबी, गणेश गल्लीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गिरगावाचा राजा आणि चंदनवाडीचा गणपती हे नावाजलेली मंडळ आहे.

- Advertisement -

किंग सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती सर्वात श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून ओळखला जातो. जीएसबीच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 69वे वर्ष असून हा उत्सव पाच दिवसांचा असतो. या गणराजाचे दागिने जडजवाहिऱ्याचे असल्याने त्याची काळजी मंडळाकडून दरवर्षा घेतली जाते. भाविक आणि सेवेदारांनी आतापर्यंत या गजाननाला तब्बल 65 किलोंहून अधिक सोन्याचे दागिने आणि 295 किलोपेक्षा अधिक चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. हे ध्यानी घेऊन जीएसबी मंडळाने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून तब्बल 360 कोटी 40 लाख रुपयांचे विक्रमी विमाकवच घेतले आहे.

- Advertisement -

गणेश गल्लीचा राजा हा ‘मुंबईचा राजा’ म्हणून त्यांची ख्याती आहे. गणेश गल्लीचा ही लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आकर्षक भव्य-दिव्य मूर्तीची स्थापन करते. लाल बागच्या राज्याच्या दर्शनानंतर भाविक गणेश गल्लीतील मुंबईच्या राज्याचे दर्शन घेण्यासाठी येतात.

चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीचा भव्य-दिव्य असा आगमन सोहळा पार पडला. मुंबईतील लालबागचा राजा आणि गणेश गल्लीतील बाप्पाची मूर्ती जागेवरच तयार होते. पण चिंचपोकळीच्या चिंतामणी होत नाही. यामुळे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळाकडे सर्वांचे लक्ष असते. चिंतामणीची मूर्ती ही लोभसवाणी असून त्यांच्या भवती आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

गिरगावचा राजा हा शाडूच्या मातीपासून बनविलेला आहे. या बाप्पाची मूर्ती ही 16 फुटांची आहे. शाडूच्या मातीपासून बनवलेली मुंबईतील ही एकमेव मूर्ती आहे.

चंदनवाडीचा गणपती ही माश्यावर उभी असलेली बाप्पाची मूर्ती आहे. या गणपतीला गोड गणपती सुद्धा म्हणतात. चंदनवाडीची यंदाची बाप्पाची मूर्ती ही 27 फूटी आहे. ही मूर्ती रेश्मा खातू यांनी चंदनवाडीच्या बाप्पाची मूर्ती बनविली आहे. बाप्पाच्या चेहऱ्यावरील तेज पाहून त्याला गोड गणपती असे नाव पडले आहे.

- Advertisment -