Maharashtra Assembly Election 2024
घरफोटोगॅलरीPHOTO : असे झाले शिवसेनेचे महाअधिवेशन; शिंदे पिता-पुत्र भावूक

PHOTO : असे झाले शिवसेनेचे महाअधिवेशन; शिंदे पिता-पुत्र भावूक

Subscribe

पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसनेचे हे पहिले महाअधिवेशन कोल्हापुरात आयोजित करण्यात आले होते. शिवसेनेचे हे महाअधिवेशन शुक्रवारी (16 फेब्रुवारी) आणि आज (17 फेब्रवारी) असे दोन दिवसीय महाअधिवेशना पार पडले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने शिवसनेच्या महाअधिवेशन समारोप झाला आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या महाअधिवेशनानिमित्ताने महासैनिक दरबार मैदानात छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या अधिवेशनाला शुक्रवारी प्रारंभ झाला होता.

- Advertisement -

या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे भाषण केले. श्रीकांत शिंदेचे भाषण ऐकून मुख्यमंत्री शिंदे भावूक झाल्याचे दिसून आले.

‘सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले’, असे ट्वीट देखील मुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदेंच्या भषणानंतर केले.

‘जे आज वारसा सांगतात त्यांनी आधी आरसा बघावा’, अशी शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

एक दिवस सोडून जाणारे हेच कार्यकर्ते आणि हा महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तुम्ही दोघेच राहाल, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -