Photos: अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे एकत्र, नक्की कारण काय?

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि तरुण खासदार राघव चढ्ढा हेसुद्धा होते. या तिघांनीही आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज या दोन पक्षांची झालेली गाठभेट फार महत्त्वाची मानली जातेय. वंचित बहुजन आघाडीने नुकतेच ठाकरे गटासोबत युती केली आहे. त्यानंतर, आपच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याने यांचीही पक्षीय समिकरणे जुळून येतात का हे पाहावं लागणार आहे.

सर्व फोटो- दीपक साळवी