महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचं यंदाचं अकरावं वर्ष. दरवर्षी प्रथेप्रमाणे ‘वसुबारस’च्या दिवशी या सोहळ्याची सुरुवात झाली. दरवर्षी वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते ह्या सोहळ्याची सुरुवात होते. ह्यावर्षी प्रसिद्ध पटकथा लेखक जोडी ‘सलीम खान आणि जावेद अख्तर’ या दोघांच्या हस्ते दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाचे उद्घाटन करताना सुप्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर.
उद्घाटनानंतर शिवाजी पार्क परिसर असा लखलखून गेला.
दीपोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मंचावर प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान, जावेद अख्तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेते रितेश देशमुख, दिग्दर्शक आशितोष गोवारीकर आणि इतर मान्यवर.
अगदी तारुण्यापासून मित्र असलेले सलीम खान आणि जावेद अख्तर यावेळी मंचावर हितगूज करताना दिसून आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयांसोबत कार्यक्रमाचा आनंद घेताना.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या मुलासोबत कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसून आले.