मात्र, न्यायालयावर विश्वास असल्याचं त्यांनी आवर्जुन नमूद केलं.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांचा आज पीएमएलए कोर्टाने जामीन अर्ज मंजूर केला. मात्र, या जामीन अर्जावर ईडीने विरोध करत जामिनावर स्थगिती आणण्याकरता ईडीने याचिका दाखल केली. पीएमएलए कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर ईडीने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात नेलं. मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयानेही त्यांना फटकारले. मुंबई उच्च न्यायालायने संजय राऊतांच्या जामिनावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानुसार, आज सायंकाळी ६.४७ मिनिटांनी त्यांना सोडण्यात आलं. (सर्व छायाचित्र – दीपक साळवी)
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आज अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. १०२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आज ते सायंकाळी ६.४७ मिनिटांनी कारागृहाबाहेर आले.
तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांनी गाडीच्या रुफ टॉपमधून बाहेर येत शिवसैनिकांना अभिवादन केलं.
संजय राऊतांना पाहण्यासाठी तुरुंगाबाहेर तुफान गर्दी झाली होती.
संजय राऊतांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही.
मात्र, न्यायालयावर विश्वास असल्याचं त्यांनी आवर्जुन नमूद केलं.
संजय राऊतांना ईडीने ३१ जुलै रोजी ताब्यात घेतलं होतं. तेव्हाही त्यांनी गळ्यातील गमछा उंचावून शिवसैनिकांना आधार दिला होता.
संजय राऊतांना जामीन मिळताच उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या आई आणि पत्नीशी फोनवरून संवाद साधला
यावेळी त्यांच्यासोबत गाडीत त्यांचे निकटवर्तीय संजय सावंत आणि जावई मल्हार नार्वेकर उपस्थित होते.
तब्बल १०२ दिवसांनंतर संजय राऊत सुटल्याने आता त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
त्यांच्या लेखणीने ते पुन्हा महाराष्ट्रातील राजकारण गाजवण्याची शक्यता आहे.