साखर आणि मध एकत्र करुन तो स्क्रब ओठांवर चोळा. या स्क्रबमुळे तुमच्या ओठांवरील निर्जीव त्वचा निघून जाते. ओठांचा रंग उजळतो. शिवाय ओठ मुलायम दिसतात.
डाळींबाचे दाणे आणि थंड दूध एकत्र करुन त्याची पेस्ट करा. ही पेस्ट ओठांवर किमान १५ मिनिटे लावून ठेवा. एक आठवडा ही पेस्ट ओठांवर लावा ओठांचा रंग उजळेल.
बीटाचा रस ओठांवर लावल्याने ओठाचा रंग उजळतो
४ लाल किंवा गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या कच्च्या दुधात वाटून टाकाव्यात. त्यात मध किंवा केशर घालावी. ती पेस्ट ओठाला लावावी. १५ मिनिटे ही पेस्ट लावून ठेवावी. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट लावावीय
रात्री झोपण्यापूर्वी बेंबीत दोन थेंब तिळाचे घालावे. ओठ मुलायम होतात आणि त्याचा रंग उजळतो.
आठवड्यातून दोनदा ऑलिव्ह ऑईलने किंवा बदाम तेलाने ओठांना मसाज करा.
लिंबामध्ये व्हिटामिन सी असते. लिंबाचा रस चोळल्यास मृत त्वचा निघून जाते.
भरपूर पाणी प्या. शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी असेल, तर ओठांवरल ओलावा टिकून राहतो