घरट्रेंडिंगपंतप्रधानांच्या आईचे शताब्दी वर्षात पदार्पण, मोदींनी निवासस्थानी जाऊन घेतला आशीर्वाद
पंतप्रधानांच्या आईचे शताब्दी वर्षात पदार्पण, मोदींनी निवासस्थानी जाऊन घेतला आशीर्वाद
हिराबेन मोदी या सध्या सध्या त्या आपले धाकटे पुत्र पंकज यांच्यासोबत गांधीनगरमध्ये राहतात. आजही त्या घरातलं जेवणच जेवतात. खिचडी, वरण-भात असं साधं जेवण त्यांच्या आहारातअसतात. गोड पदार्थांमध्ये त्यांना लापशी खूप आवडते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा आज १०० वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित मोदींनी गांधीनगरमधील त्यांच्या निवावस्थानी जाऊन आईचे पाय धुतले आणि आशीर्वाद घेतला.वाढदिवसानिमित्त नमस्कार करून आईचा आशिर्वाद मोदींनी घेतला.नरेंद्र मोदी त्यांच्या आईच्या मांडीवर हात ठेवून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असल्याचे दिसते.१०० व्या वर्षात पदार्पण केल्याने गोड पदार्थ खाऊ घालत मोदींनी आईला शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आईच्या वाढदिवसानिमित्त ते मातृशक्ती योजनेचं उद्धघाटन करणार आहेत. त्याचबरोबर निरनिराळ्या 21 हजार कोटींच्या योजनांचा शुभारंभ करणार आहेत.