Police commemoration Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शहीद पोलिसांना श्रध्दांजली

देशभरात २१ ऑक्टोबर हा पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो.

Police commemoration Day: Chief Minister Uddhav Thackeray and Ajit Pawar pay homage to martyred police
Police commemoration Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शहीद पोलिसांना श्रध्दांजली

संपूर्ण देशभरात २१ ऑक्टोबर हा पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रध्दांजली वाहिली जाते. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली. त्या दिवसापासून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी, शूर पोलीस शहीदांच्या सन्मानार्थ सर्व पोलीस युनिटमध्ये स्मारक परेड आयोजित केले जाते. आज मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबईतील पोलीस स्मारकावर श्रद्धांजली वाहिली. (छाया : दिपक साळवी) 

 


हे ही वाचा – Shah Rukh Khan Meets Aryan: २० दिवसानंतर बाप-लेकाची भेट, एकमेकांना पाहून ढसाढसा रडले