लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी लतादीदींची प्राणज्योत मालवली. लता दीदींच्या निधनाची माहिती समजताच राजकीय, बॉलिवूड क्षेत्रातील अनेक जण ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. दादरच्या शिवाजी पार्क येथे लता दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी लतादीदींचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांनी पेडर रोड येथील लता दीदींच्या प्रभूकुंज येथे जाऊन अंत्य दर्शन घेतले. प्रभूकुंज ते शिवाजी पार्क या लता दीदींच्या अंतिम प्रवासात त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जनसमुदाय लोटला होता. पाहा लता दीदींच्या अंत्यदर्शनाचे भावूक क्षण ( फोटो दीपक साळवी, सचिन हरळकर )