शिवाजी पार्कमध्ये ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त मुंबई पोलिसांची जय्यत तयारी

26 जानेवारीला देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मुंबई पोलिसांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदा देखील विविध प्रकारचे पोलिस दल, सुरक्षा, शालेय विद्यार्थी, फायर ब्रिगेड परेडमध्ये भाग घेणार आहेत. त्याचीच तयारी म्हणून आज शेकडो पोलीस कर्मचारी या सरावासाठी उपस्थित झाले होते.

Photo by Deepak Salvi