राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत जंगी स्वागत

एनडीए कडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत दाखल झाल्या.

एनडीए कडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत दाखल झाल्या. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमातळावर पोहोचले होते.त्यानंतर ते सर्वजण अंधेरी येथील लीला हॉटेलमध्ये पोहोचले., तिथे त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजपचे अनेक नेते तिथे उपस्थित होते.