prime minister narendra modi share a video with young children
- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा मुलांसबोत मस्ती करताना दिसतात. नरेंद्र मोदी हे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लहान मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी सोडत नाहीत. मुलांसोबत मस्ती करतानाचा एक व्हिडीओ नरेंद्र मोदी यांनी त्यांचा इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.
सुरुवातीला नरेंद्र मोदी दोन लहान मुलांच्या डोकं एकमेकांवर आदळतात. त्यानंतर मोदींना मुलांना एक जादू दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान मोदींनी एक नाणं स्वत:च्या कपाळावर चिपकवाता आणि डोक्याच्या मागे मारून ते नाणे खाली पाडतात.
आधी मुलं आपापसात भांडताना दिसतात… लहान मुलीसोबतच ही जादू करतात मात्र यावेळी ते चलाखीने नाणं बाजूला काढून घेतात आणि त्यानंतर मुलीच्या डोक्यावर मारतात. पण नाणे खाली पडत नाही. त्यानंतर मुलगी हातात नाणं असल्याचे सांगते.
लहान मुलासोबतही हिच जादू मोदींनी केली. मात्र त्या लहानमुलाला शेवटपर्यंत नाणं मिळत नाही.
नरेंद्र मोदी अनेकदा विविध राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांची भेट घेत असतात. यावेळी त्यांच्या कुटंबातील लहान मुलांसबोत पंतप्रधान मोदी आपला वेळ घालवतात. दोन लहान मुलांसोबत मोदी मजामस्ती करताना दिसत आहेत.
मोदींनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मुलांसबोत घालवलेले काही संस्मरणीय क्षण असे कॅप्शन दिले आहे. मुलांसोबत वेळ घालवण्याची मोदींची पहिलीच वेळ नाही. याआधीही ते अनेक प्रसंगी मुलांसोबत हसताना आणि मस्ती करताना दिसले होते.