मुंबईत बुधवारपासून सलग तीन दिवस ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथे झालेल्या या संमेलनात जगभरातील तर विविध राज्यांतून मराठी भाषिक उपस्थित होते.या संमेलनाचे आयोजन राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.मराठी माणूस मुंबईतून बाहेर जाता कामा नये आणि मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसांना मुंबईत परत आणण्यासाठी पुनर्विकासाच्या थांबलेल्या प्रकल्पात आणि कायद्यात बदल करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनात दिले.
मुंबईत बुधवारपासून सलग तीन दिवस ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन करण्यात आले आहे.
वरळी येथे झालेल्या या संमेलनात जगभरातील तर विविध राज्यांतून मराठी भाषिक उपस्थित होते.
या संमेलनाचे आयोजन राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
मराठी माणूस मुंबईतून बाहेर जाता कामा नये आणि मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसांना मुंबईत परत आणण्यासाठी पुनर्विकासाच्या थांबलेल्या प्रकल्पात आणि कायद्यात बदल करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनात दिले.
‘देशातील अनेक राज्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मध्यप्रदेशात वैद्यकीय शिक्षण हिंदीतून सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण मराठीतून करू’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे.
जगातील मराठी भाषिकांना एकत्र करण्यासाठी गेली वीस-पंचवीस वर्षे खासगी संस्था साहित्य-सांस्कृतिक संमेलने घेत आहे. अशातच आता शासनानेही विविध देशांतील मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी विश्व संमेलनाचे आयोजन केले आहे.