Photo : हाती भोपळा घेत विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर झाला. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी वेगवेगळ्या टीकेला सुरूवात केलीय. तत्पूर्वी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी हातात भोपळे आणि कोहळे घेऊन आंदोलन केलंय. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.