घरफोटोगॅलरीरायगड जिल्ह्याला पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

रायगड जिल्ह्याला पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

Subscribe

नदी किनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ५  ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी आणि अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पाऊस पडत असताना मासेमारीसाठी व पोहायला समुद्रात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये.मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02141- 228473 आणि जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी 02141- 222097 या क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.


हे ही वाचा – जरा धीर धरा, मंदिर उघडण्याच्या मागणीवरुन मुख्यमंत्र्यांनी भाजप-मनसेला फटकारले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -