Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी PHOTO: शिवाजी पार्क मैदानावर 'राज' दरबार

PHOTO: शिवाजी पार्क मैदानावर ‘राज’ दरबार

Subscribe

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा बुधवारी शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले होते. भाषणात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्याची राज ठाकरे यांनी पुन्हा आठवण करुन दिली. माहिम समुद्रात उभा राहत असलेला अनधिकृत दर्गा, गितकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला तेथे जाऊन सुनावलेले खडेबोल यासह विविध मुद्दे राज ठाकरे यांनी मांडले. मनसेच्या मेळाव्यातील काही क्षण…

- Advertisement -

राज ठाकरे यांची सभेत थोडी उशिराच इंट्री झाली. मात्र स्टेजपर्यंत जाताना राज यांनाही गर्दीतूनच मार्ग काढावा लागला.

- Advertisement -

गितकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन खडेबोल सुनावले होते. त्या मुलाखतीचा व्हिडिओ खास राज ठाकरे यांनी मेळाव्यात दाखवला. मला असे मुस्लमान हवेत, असे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले.

माहिम समुद्रात अनधिकृतपणे दर्गा उभारला जात आहे. या दर्ग्याचा व्हिडिओ दाखवून राज ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली. तसेच हा अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणीही राज यांनी केली आहे.

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात एकच गर्दी झाली होती.

- Advertisment -