ठाणे : राजापूर विधानसभेचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज (13 फेब्रुवारी) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी राजापूर, लांजा, साखरपामधील जवळपास 700 कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. यात उपजिल्हाप्रमुख, पंचायत समिती, नागराध्यक्ष, नगरसेवक सभापती युवासेनेचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, कोकण आता भगवमय झाला पाहिजे. कारण बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केले. तसेच कोकणाचा राहिलेला विकास आपल्याला करायचा आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. (Rajan Salvi joined Shiv Sena party in the presence of Eknath Shinde)
Photo : एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी हाती घेतले शिवधनुष्य
written By rohit patil
Thane

संबंधित लेख