घरफोटोगॅलरीरकुल प्रीत सिंह आणि जॅकीने लग्नाआधी घेतलं बाप्पाचं दर्शन

रकुल प्रीत सिंह आणि जॅकीने लग्नाआधी घेतलं बाप्पाचं दर्शन

Subscribe

सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार लग्न करत आहेत. मागच्या महिन्यात देखील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले. अशातच, बॉलिवूडमधील प्रसिद्धी कपल अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे दोघे लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, आता लग्नाआधी दोघांनीही प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिला बाप्पाचे दर्शन घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

यावेळी रकुलने पिंक कलरचा सुंदर ड्रेस घातला होता. तर जॅकीने पिस्ता कलरचा कुर्ता घातला होता. चाहते त्यांच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत.

- Advertisement -
‘या’ दिवशी करणार लग्न

रकुल आणि जॅकीने मंदिरातून प्रसाद घेतला

रकुल आणि जॅकी गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असून 21 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचे लग्न असणार आहे.

- Advertisement -
अशी झाली लव्ह स्टोरीला सुरुवात

रकुल आणि जॅकीची लव्ह स्टोरी लॉकडाऊनच्या काळात सुरु झाली. दोघांची पहिली भेट कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू याचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2021 मध्ये जॅकीने सोशल मीडियावर रकुल बद्दलचं प्रेम व्यक्त केले होते. तसेच तिच्या वाढदिवशी रकुलने जॅकीसोबतचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये तिने देखील तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

 


हेही वाचा : ‘दंगल’मधील ज्युनियर बबिताचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -