घरफोटोगॅलरीRanbir Alia Wedding : रणबीर- आलियाच्या शाही लग्नातील विधींना सुरुवात

Ranbir Alia Wedding : रणबीर- आलियाच्या शाही लग्नातील विधींना सुरुवात

Subscribe

बॉलिवूडमधील पॉवरफूल कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या शाही विवाह सोहळ्यातील विधींना आजपासून सुरुवात झाली आहे. रणबीरची चुलत बहीण करीना कपूर खान, करिश्मा कपूर, आत्या रिमा जैन (दिवंगत ऋषी कपूर यांची बहीण) आणि चुलत बहीण निताशा नंदा (रितू आणि राजन नंदा यांची मुलगी) यांनी विवाह सोहळ्यापूर्वीच्या विधींना हजेरी लावली आहे. पाली हिल्स येथील वास्तू या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये रणबीर आणि आलियाच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली. यासाठी दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. दरम्यान 14 ते 17 एप्रिल दरम्यान दोघांच्या विवाह सोहळ्यातील कार्यक्रम होणार आहे. आजपासून या दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. आज आलिया आणि रणबीरच्या मेहंदी सेरेमनीला सुरुवात झाली आहे.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -