देशभरात उद्या, बुधवारी ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महत्त्वाच्या वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमुळे मुंबई प्रकाशमय झाली आहे. मुंबईतील सीएसएमटी स्टेशन, मुंबई महापालिकेची इमारत,बॉम्बे स्टॉक एक्सचेंज,मंत्रालय सारख्या भव्य इमारतींना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. पाहा, प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना केलेली आकर्षक विद्युत रोषणाई (छाया : दीपक साळवी)