Restaurant on wheels: रेल्वेच्या बोगीत थाटलं हॉटेल

restaurant on wheels set up at csmt station mumbai
Restaurant on wheels: रेल्वेच्या बोगीत थाटलं हॉटेल

मुंबईची लाईफ लाईन म्हणजे आपली लोकल. आपण आजवर केवळ रेल्वेच्या डब्ब्यातून प्रवासच केला आहे. मात्र आता या रेल्वेच्या डब्ब्याचे रुपांतर आलिशान रेस्टॉरंटमध्ये झाले आहे. आजवर सीएसएमटी स्टेशनवर बऱ्याच वेळा गेलो आहोत. मात्र ते फक्त प्रवासासाठी मात्र आता रेल्वेच्या बोगीत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये बसून जेवणाचा आनंद घेता येणार आहे. सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ समोर रेल्वेच्या बोगीत हॉटेल तयार करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची चित्रे काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेस्टॉरंटच्या आतील भागात देखील चांगल्या प्रकारचे इंटिरिअर तयार करण्यात आले आहे. रेल्वेच्या बोगीतून प्रवास करताना ज्या गोष्टी आपल्याला पहायला मिळतात त्या सर्व गोष्टी या रेस्टॉरंटमध्ये पहायला मिळत आहेत. ग्राहकांनी पहिल्या दिवशी रेस्टॉरंटला फारसा प्रतिसाद दिलेला नाही मात्र आता हळूहळू ग्राहक या रेस्टॉरंटकडे वळताना दिसत आहेत. ( छायाचित्र – दीपक साळवी )