सावित्रीबाई जिंदाल- सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. ज्यांची एकूण संपत्ती 34.3 अब्ज डॉलर इतकी आहे. म्हणजेच 3,430 कोटी रूपये इतकी आहे. 2005 मध्ये त्यांचे पती ओ.पी. जिंदाल यांच्या निधनानंतर, त्यांनी कंपनीची जबाबदारी घेतली आणि कंपनीला एका नव्या उंचीवर नेलं. जिंदाल ग्रुप हे स्टील आणि वीज उत्पादनातील एक आघाडीचे नाव आहे. त्या सामाजिक कार्यकर्त्यादेखील आहेत.
रेखा झुनझुनवाला- राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर रेखा झुनझुनवाला यांनी त्यांच्या पतीचा व्यवसाय सांभाळला. 2022 मध्ये शेअर्सचे अधिकार त्यांना प्राप्त झाल्यानंतर 800 कोटी रुपयांच्या त्या मालक बनल्या.
रेणुका जगतियानी- रेणुका जगतियानी यांची एकूण संपत्ती जवळपास 560 कोटी रूपये इतकी आहे. त्या युनायटेड अरब एमीरेट्स मध्ये असलेल्या लँडमार्क कंपनीच्या मालक आहेत. व्यवसाय क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल, रेणुका यांना २००७ मध्ये उत्कृष्ट आशियाई बिझनेस वुमन ऑफ द इयर आणि २०१२ मध्ये बिझनेसवुमन ऑफ द इयर सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
विनोद राय गु्प्ता- 78 वर्षीय विनोद राय गुप्ता यांची एकूण संपत्ती 470 कोटी रुपये इतकी आहे. विनोद राय गुप्ता या देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिकल वस्तू उत्पादक कंपनी हॅवेल्सच्या मालक आहेत. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी हा व्यवसाय करण्यास सुरूवात केली. हॅवेल्सचे देशभरात 14 कारखाने आहेत आणि त्यांची उत्पादने 50 हून अधिक देशांमध्ये विकली जातात.
स्मिता कृष्ण गोदरेज – गोदरेज कुटुंबाच्या सदस्या स्मिता कृष्ण गोदरेज या गोदरेज समूहाच्या 20% मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 350 कोटी रूपये इतकी आहे. ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादनात आणि रिअल इस्टेट व्यवसायात त्यांच्या कंपनीचा मोठा वाटा आहे.
किरण मुजुमदार शॉ- किरण मुजुमदार यांची संपत्ती 340 कोटी रुपये इतकी आहे.त्यांनी 1978 मध्ये बायोकॉनची स्थापना केली, जी आज भारतातील सर्वात मोठ्या बायोटेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एक आहे. औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञानातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. फोर्ब्सच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या 50 मध्येही समाविष्ट झाले आहे.
राधा वेम्बू- जोहो कॉर्पोरेशनच्या सहसंस्थापिका राधा वेम्बू यांची नेटवर्थ 320 कोटी रुपये इतकी आहे. झोहोच्या पलीकडे, राधा वेम्बू या हायलँड व्हॅली कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट फर्ममध्ये आणि जानकी हाय-टेक अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कृषी स्वयंसेवी संस्थेत संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.
अनु आगा- 1996 मध्ये आपल्या पतीच्या मृत्यूनंतर अनु आगा यांनी थर्मेक्स या इंजिनियरींग कंपनीचा सांभाळ केला. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 310 कोटी इतकी असते. त्या सामाजिक कार्यकर्त्याही आहेत.
लीना तिवारी- फार्मास्युटिकल आणि बायोटेक कंपनी यूएसवीच्या संचालिका लीना गांधी तिवारी यांची एकूण संपत्ती 310 कोटी रुपये इतकी आहे. लीना तिवारी यांची कंपनी इंजेक्शनेबल आणि बायोसिमिलर औषधे तयार करते. ही कंपनी मधुमेहावरील औषधे बनवणाऱ्या भारतातील टॉप 3 कंपन्यांपैकी एक आहे.
फाल्गुनी नायर- कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेट बँकेत 18 वर्षे व्यवस्थापकीय संचालक आणि कोटक सिक्युरिटीजमध्ये संचालक म्हणून फाल्गुनी नायर यांनी काम केले. आणि 2012 मध्ये करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी आपली कारकीर्द सोडली व नायका या नव्या ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रातील कंपनीची स्थापना केली. नायका ही भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. त्यांच्या कंपनीने अनेक महिलांना स्वावलंबी होण्यास मदत केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 290 कोटी रूपये इतकी आहे.